मुंबई | प्रतिनिधी
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात “पॅसिफिक वेलनेस स्पा” या नावाखाली सुरु असलेल्या कथित हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. या स्पा सेंटरमध्ये कमी वयाच्या मुली (नाबालिक) सुद्धा सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सदर स्पा सेंटर सिटिझन बिल्डिंग, पहिला मजला, लोखंडवाला हाय पॉईंट समोर, अंधेरी (प.) मुंबई ४००१०२ येथे स्थित असून, स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार येथे बेकायदेशीर देहविक्री व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक नागरिकांनी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अधिकृत लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे की, “पॅसिफिक वेलनेस स्पा” च्या नावाखाली सुरू असलेल्या या केंद्रात हाय प्रोफाईल देहविक्री, संशयास्पद हालचाली व अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे यावर तातडीने कारवाई न झाल्यास कायद्याच्या रक्षणात ढिलाई होत असल्याचा संदेश समाजात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सदर तक्रारीची प्रत मुंबई पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणावर पोलीस विभाग काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.