स्वॅब संकलन घोटाळा उघड !बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागात काम पूर्ण होऊन ३.५ वर्षांनी दिले कंत्राट सहाय्यक अभियंता परिरक्षण संतोष निकाळजे यांच्या भूमिकेवर संशय
जागता महाराष्ट्र/प्रतिनिधी मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या P/N विभागात कोविड काळात करण्यात आलेल्या स्वॅब संकलनाच्या कामावर मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे.Vittal’s Medicare या खाजगी संस्थेला रु. १७,९६,५००/- चे काम दिले गेले होते, ज्याचे काम ऑक्टोबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. मात्र, या कामासाठी संबंधित खरेदी आदेश काम १३ मार्च २०२५ रोजी, म्हणजे तब्बल ३.५ वर्षांनी मंजूर करण्यात आला ! ही बाब अतिशय गंभीर असून, यामध्ये सहाय्यक अभियंता परिरक्षण संतोष निकाळजे (VE-DCE-01) या अधिकाऱ्यांचा सहभाग असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.घोटाळ्याचे ठळक मुद्देः’उलट तारखेला’ मंजूरी- काम संपल्या नंतर३ वर्षांनी निविदा काढणे नियमबाह्य. लेखा व आरोग्य विभागातील मिलीभगत संशय. दंडशुल्क वसुली शून्य उशिरा मंजुरी केले . संतोष निकाळजे यांची भूमिका संशयास्पद – प्रकरणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय
सहभाग.तक्रारदाराच्या मागण्याः
1. स्वतंत्र चौकशी (ACB/CVC मार्फत) सहाय्यक अभियंता श्री.संतोष निकाळजे यांच्यावर कारवाई. निलंबनाची कार्यवाही व दोष निश्चित झाल्यावर शिस्त भागाची कार्यवाही करण्यात यावी.
2 भविष्यातील कंत्राट मंजुरी धोरण कठोर करणे.
3 विक्रेत्याकडून चुकीची रक्कम वसूल करणे प्रशासनाची भूमिका संशयास्पद ! या प्रकरणात महानगरपालिकेतील संबंधित खात्यांनी गंभीर दुर्लक्ष केले आहे. कोविड काळातील आरोग्यविषयक सेवेवर आधारित असल्याने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.असूनही विक्रेत्यावर कोणतीही कारवाई नाही. कंत्राट प्रक्रिया अपारदर्शक निविदा, जाहिरात व लेखी नियमांचे उल्लंघन.जनतेचा सवाल:कामाच्या प्रक्रिये दरम्यान कागद पत्रांची उणीव चौकशी नंतरच आवश्यक पुरावे मागवले कोविड सारख्या महामारीत नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी निधी मिळवलेला होता की कमिशन साठी ?