सह निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप
नोंदणी व मुद्रांक विमान सह दुय्यम निबंधक वर्ग-२. कार्यालय पनवेल क्रमांक
पनवेल – सह निबंधक क्र. २. २ व ५ तसेच १ व ४ कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी, विक्रीखरेदी व्यवहार तसेचा इतर दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांनी थेट कार्यालयात येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र दलालांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती व हस्तक्षेप दिसून येतो.
दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये दलालांचा सहभाग इतका वाढला आहे की, नागरिकांना थेट प्रक्रिया समजून घेण्याऐवजी दलालांच्या माध्यमातूनच काम करण्याची सक्ती होऊ लागली आहे. यामुळे अतिरिक्त आर्थिक बोजा तर पडतोच, पया प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमाप्रमाणे, कोणताही दस्त किंवा व्यवहार नोंदणीसाठी नागरिकांना थेट सह निबंधक कार्यालयात जाऊन अर्ज व दस्त स्वादर करता येतात. यासाठी शासनाने आवश्यक ती यंत्रणा आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत अधिकारी नेमले आहेत. मात्र तरीही कार्यलयाच्या परिसरात दलालांचे वर्चस्व वाहत असून, काही वेव्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संमतीने ही मध्यस्थी होत असल्याचे आरोप देखील आहेत.
नागरिकांचे म्हणणेः सरळ काम करायचे म्हटले तरी
कर्मचारी असुऱ्या माहितीचा हवाला देऊन काम लांबवतात. मग शेवटी दलालच पर्याव उरतो, असे एका स्थानिक नागरिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
कारवाईची गरजः या प्रकारांमुळे सह निबंधक कार्यालयातील कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास कमी होत चालला आहे. संबंधित प्रशासकीय अधिका-यांनी या दलालगिरीवर कठोर उपाययोजना करणे, तसेच नागरिकांना थेट सेवा देण्यासाठी सजग प्रणाली निर्माण करणे ही काळाची गरज आहे