6 Feb 2026, Fri
HEADLINES
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ओशिवरामध्ये “पॅसिफिक वेलनेस स्पा” च्या नावाखाली सुरू हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश?

मुंबई | प्रतिनिधी

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात “पॅसिफिक वेलनेस स्पा” या नावाखाली सुरु असलेल्या कथित हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. या स्पा सेंटरमध्ये कमी वयाच्या मुली (नाबालिक) सुद्धा सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सदर स्पा सेंटर सिटिझन बिल्डिंग, पहिला मजला, लोखंडवाला हाय पॉईंट समोर, अंधेरी (प.) मुंबई ४००१०२ येथे स्थित असून, स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार येथे बेकायदेशीर देहविक्री व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक नागरिकांनी ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अधिकृत लेखी तक्रार दिली आहे.

तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे की, “पॅसिफिक वेलनेस स्पा” च्या नावाखाली सुरू असलेल्या या केंद्रात हाय प्रोफाईल देहविक्री, संशयास्पद हालचाली व अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे यावर तातडीने कारवाई न झाल्यास कायद्याच्या रक्षणात ढिलाई होत असल्याचा संदेश समाजात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सदर तक्रारीची प्रत मुंबई पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणावर पोलीस विभाग काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed